Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेट्रोल डिझेलची किंमत: सलग 16 व्या दिवशी दिलासा, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले

Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (11:10 IST)
सरकारी तेल कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यात 17 जुलैपासून डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता,तर या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या नाहीत.
 
आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये तर डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर आहे.चेन्नईमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे, येथे पेट्रोल 102.49 रुपये लिटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर आहे.
 
प्रमुख महानगरांमध्ये किंमत किती आहे ते जाणून घ्या
आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत.
 
दिल्ली शहरात डिझेल 89.87 ,पेट्रोल 101.84,
मुंबई शहरात डिझेल 97.45 ,पेट्रोल107.83 
कोलकाता शहरात डिझेल 93.02 ,पेट्रोल ,102.08  
चेन्नईशहरात डिझेल,94.39 ,पेट्रोल 102.49
(पेट्रोल-डिझेलची किंमत प्रति लिटर आहे.) 
 
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक,ओडिशा,जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 100 रुपयांच्या पुढे आहे. याशिवाय मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या महानगरांमध्ये पेट्रोलने आधीच 100 रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे.    
 
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 पासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी,डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 
या पॅरामीटर्सच्या आधारावर तेल कंपन्या दररोज पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. ते किरकोळ किमतीत पेट्रोल स्वतः ग्राहकांना विकतात जे कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्या नंतरअसतात हा दर पेट्रोल दर आणि डिझेल दरातही जोडला जातो. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

iPhone 16:भारतात iPhone 16 विक्री सुरू होताच दुकानाबाहेर लांबच लांब रांगा

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, दिल्लीच्या 3 पोलिस ठाण्यात भाजपची तक्रार दाखल

पुण्यातून पुणे दुबई आणि पुणे बँकॉक विमानसेवा लवकर सुरु होणार

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी तब्बल 300 मोबाईल चोरले

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेला उशीर झाल्याबद्दल संजय राऊत काँग्रेसवर नाराज

पुढील लेख
Show comments