Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Petrol-Diesel Price Today:आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले ? नवीनतम इंधन दर जाणून घ्या

petrol diesel
, मंगळवार, 24 मे 2022 (10:28 IST)
सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलची नवीन किंमत जाहीर केली. मात्र, मंगळवारी 24 मे रोजी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने वाहनांच्या इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले, त्यानंतर तेलाच्या किमती कमी झाल्या. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील 6 रुपयांनी कमी केले आहे. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, 21 मे नंतर पुन्हा भाव स्थिर राहिले आहेत. चला जाणून घेऊया आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर काय आहेत?
 
महाराष्ट्रातील मुंबई शहरात मंगळवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तर, बृहन्मुंबईमध्ये , पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.43 रुपये तर डिझेलचा दर 95.90 रुपये प्रतिलिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.04 रुपये तर डिझेलचा दर 95.52 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रतिलिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.87 रुपये तर डिझेलचा दर 96.35 रुपये आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वरातीत गाणं गाणाऱ्या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू