Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 July 2025
webdunia

ग्राहकांना धक्का! टोयोटाने केली दरवाढीची घोषणा,'या 'गाड्या महागणार

Push customers! Toyota announces price hike ग्राहकांना धक्का! टोयोटाने केली दरवाढीची घोषणा
, बुधवार, 15 डिसेंबर 2021 (16:45 IST)
टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) 1 जानेवारी 2022 पासून तिच्या सर्व वाहनांच्या किमती वाढवणार आहे. रॉ -मटेरियलच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टोयोटा भारतीय बाजारपेठेत ग्लान्झा, अर्बन क्रूझर, इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर सारखी वाहने विकतात.या मुळे आता  अर्बन क्रूझर, इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर गाड्या आता महागणार.
कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "रॉ -मटेरियलसह इनपुट कॉस्टमध्ये सतत वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमतीत बदल करणे आवश्यक आहेत. आमच्या ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम कमी होईल याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.” 
 टोयोटा व्यतिरिक्त, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि होंडा कार्सने देखील पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. स्टील, कॉपर आणि अॅल्युमिनियम यासारख्या आवश्यक रॉ-मटेरियलच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एका चॉकलेट ने लखपती बनवले