RBI ने ICICI बँकेवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBI ने बँकेला 12.19 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेवरही कडक कारवाई करण्यात आली असून 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI ने 7 दिवसात 5 विरुद्ध घेतले मोठे निर्णय-
नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनियन बँक ऑफ इंडिया, आरबीएल बँक आणि बजाज फायनान्स लिमिटेडवर दंड ठोठावला.
पेटीएम बँक आणि अण्णासाहेब मगर सहकारी बँकेवर KYC नियमांशी संबंधित काही तरतुदींचे उल्लंघन, बँकांमधील सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, UPI पायाभूत सुविधांसह मोबाइल बँकिंगचा वापर सुरक्षित करण्यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. RBI ने खाजगी क्षेत्रातील RBL बँक लिमिटेडला 64 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे, NBFC मार्गदर्शक तत्त्वे 2016 मधील फसवणूक निरीक्षणाचे पालन न केल्याबद्दल बजाज फायनान्स लिमिटेडला 8.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.