रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने तीन सहकारी बँकांना नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी दंड ठोठावला. या बँकांमध्ये नाशिकमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईतील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि बेतिया येथील नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या तीन बँकांचा समावेश आहे.
रिझव्र्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, फसवणूक अहवाल आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या नाबार्ड (नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) च्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईला ३७ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
इतर बँकांमध्ये ठेवी ठेवण्याबाबत आणि ठेवींवर व्याज देण्याबाबत आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
नॅशनल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बेतिया, बिहार यांना ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि आपले ग्राहक जाणून घ्या (केवायसी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी हा दंड ठोठावण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.