मुंबई- रिलायंस ब्रांड्स लिमिटेड, रिलायंस इंडस्ट्रीजची एक सहायक कंपनीने हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेडच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे.
रिलायंस ब्रांड्सने हांगकांग स्थित सी बॅनर इंटरनेशनल होल्डिंग्सहून याचे 100 टक्के शेअर खरेदी करण्याचा करार केला आहे. सी बॅनर इंटरनेशनल होल्डिंग्स हॅमलेजची ब्रांड ओनर आहे.
सुमारे 259 वर्षांपूर्वी 1760 साली स्थापित हॅमलेज जगातील सर्वात जुनी आणि मोठी टॉय शॉप आहे जी नंतर ग्लोबल कंपनीमध्ये परिवर्तित झाली. दोन दशकांपासून हॅमलेज उत्कृष्ट खेळण्यांद्वारे मुलांच्या चेहर्यांवर हसू आणण्यात यशस्वी ठरली आहे. हॅमलेज खेळणींची गुणवत्ता आणि विस्तृत रेंज प्रस्तुत करण्यात आणि विस्तारित करण्यात यशस्वी ठरली आहे.
कंपनीने थिएटर आणि मनोरंजनसह आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार केला आहे. हॅमलेज ब्रँडची 18 देशांत 167 दुकानं आहेत. हॅमलेजची सर्वात मोठी फ्रॅन्चायझी भारतात रिलायन्सकडे होती. रिलायन्स 29 शहरांत 88 दुकानांतून या ब्रँडची खेळणी विकत होती. या अधिग्रहणानंतर रिलायंस ब्रांड्स ग्लोबल टॉय इंडस्ट्रीमध्ये एक प्रमुख कंपनीच्या रुपात दिसेल.
मागील काही वर्षात आम्ही भारतात हॅमलेज ब्रँन्डच्या खेळणीची रिटेल विक्रीत यश मिळवले आहे आणि हे एक फायद्याच्या व्यवसायात परिवर्तित झाले आहे. या आयकोनिक हॅमलेज ब्राँन्ड आणि व्यवसायाच्या जगातिक अधिग्रहणासह रिलायंस आता ग्लोबल रिटेलिंगमध्ये एक प्रमुख कंपनी बनून समोर येईल. अशी प्रतिक्रिया रिलायन्स ब्रँडचे चेअरमन आणि सीईओ दर्शन मेहता यांनी दिली.