Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

SBI चं नवीन नियम, कॅश जमा करण्यासाठी 56 रुपये चार्ज

SBI चं नवीन नियम, कॅश जमा करण्यासाठी 56 रुपये चार्ज
एक ऑक्टोबरपासून भारतीय स्टेट बँकेने आपले बँक चार्ज आणि ट्रांझेक्शनच्या नियमांत परिवर्तन केले आहे. बँक एक ऑक्टोबरपासून आपल्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करणार आहे. ज्यात बँकेत रुपये जमा करणे, काढणे, चेक वापरणे, एटीएम ट्रांझेक्शन यासंबंधित सर्व्हिस चार्ज सामील आहेत.
 
बँकेच्या सर्कुलर प्रमाणे एक ऑक्टोबरपासून आपण एक महिन्यात केवळ तीन वेळा मोफत पैसे जमा करू शकतात. यानंतर खात्यात रुपये जमा करण्यासाठी 50 रुपये (जीएसटी अतिरिक्त) चार्ज द्यावा लागेल. पाचवी किंवा त्यानंतर रक्कम जमा करण्यासाठी आपल्याला 56 रुपये चार्ज मोजावा लागेल मग ती रक्कम एक रुपये का नसो.
 
या व्यतिरिक्त एखाद्या कारणामुळे चेक बाऊंस झाल्यास चेक जारी करणार्‍यावर 150 रुपये (जीएसटी अतिरिक्त) भरावे लागतील. जीएसटीसह हा चार्ज 168 रुपये असणार. नवीन नियमांप्रमाणे जेथे बँकेने एटीएमद्वारे होणार्‍या ट्रांझेक्शनची संख्या वाढवली आहे तेथे बँकेच्या शाखेत जाऊन एनईएफटी आणि आरटीजीएस करणे महागात पडेल.
 
बँकेने सर्कुलर जारी करत म्हटले की देशाचे सहा मेट्रो शहर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलूरू आणि हैदराबाद येथे बँकेच्या एटीएमवर लोक दर महिन्याला 10 ट्रांझेक्शन करू शकतील. तसेच इतर शहरात एसबीआयच्या एटीएमवर 12 ट्रांझेक्शन करू शकतील. जर ग्राहक दूसर्‍या बँकेचा एटीएम वापरत असेल तर त्याला महिन्यात पाच ट्रांझेक्शनची सुविधा देण्यात येईल.
 
25 हजार रुपयांहून अधिक मिनिमम एवरेज बँलेंस ठेवणार्‍यांना बँक एटीएमचा वापर अमर्यादित केला जाईल. तसेच याहून खाली एवरेज बँलेंस ठेवणार्‍यांना जुन्या नियमांनुसार आठ मोफत ट्रांझेक्शनच करता येतील. सॅलरी खातेधारकांना देशातील कोणत्याही बँक आणि एसबीआयचे एटीएम वापरल्यावर कोणत्याही प्रकाराचा शुल्क देण्याची गरज पडणार नाही. हे खाताधारक अमर्यादित ट्रांझेक्शन करू शकतील.
 
ग्राहक बँक शाखेत जाऊन आरटीजीएस किंवा एनईएफटी करवतात तर त्यांना चार्ज द्यावा लागेल. तरी नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा योनो एपद्वारे केल्या जाणार्‍या ट्रांझेक्शनवर कोणताही चार्ज लागणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्थिक मंदीः आता स्टील उद्योगातील कामगारांच्या नोकऱ्यांवरही कुऱ्हाड