Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी !गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत, हे मोठे बदल मार्चमध्ये होणार

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:45 IST)
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी असे अनेक बदल पाहायला मिळतात जे तुमच्या खिशासह दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. या अंतर्गत एलपीजी सिलेंडरच्या किंमती ते बँकिंग सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यावेळीही गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय मार्च 2022 मध्ये आणखी काही विशेष बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्व सामान्य माणसांवर होईल. 
 
1 एलपीजी सिलेंडरची किंमत -प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केली जाते. गॅसच्या किमतींचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराशी असल्याने लोकांच्या नजरा त्यावर सर्वाधिक असतात. अलीकडील काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे 1 मार्च 2022 रोजी त्याच्या किमतीत बदल होणे अपेक्षित आहे. 1 मार्च रोजी सिलिंडरच्या किमती वाढतात की त्याचे दर स्थिर राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 
2 IPPB शुल्क आकारणार - IPEB म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या डिजिटल बचत खात्यासाठी क्लोजर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. आपले इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बचत खाते असल्यास हे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 150 रुपये असेल आणि जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल. बँकेचा हा नवीन नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. 
 
3 पेन्शनधारकांसाठी सवलत संपणार- पेन्शनधारकांसाठी 28 फेब्रुवारी ही जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख आहे. म्हणजेच मार्च महिन्यापासून या सरकारने दिलेली ही सूट संपुष्टात येणार आहे. निवृत्ती किंवा पेंशन वेतन सतत मिळत राहण्यासाठी, निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र 1 मार्च पूर्वी म्हणजेच आजपर्यंत वेळेवर सादर करणे आवश्यक आहे. सामान्यतः जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख दरवर्षी 30 नोव्हेंबर असते, परंतु सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा देत, या वर्षी ही तारीख दोनदा वाढवण्यात आली. मुदतीपूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन बंद होईल. अशा परिस्थितीत घरी बसूनही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करावे लागेल.
 
4 आरबीआयने डिजिटल पेमेंटमध्ये बदल- आर बी आय ने डिझिटल पेमेंट मध्ये मोठे बदल करण्याची तयारी केली आहे. प्रोप्रायटरी क्यू आर कोड युजर्स एक किंवा अधिक इंटरऑपरेबल क्यू आर कोडकडे वळतील. ही हस्तांतरण प्रक्रिया 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच रिझर्व्ह बँकेने सांगितले की, कोणताही पीएसओ  कोणत्याही पेमेंट व्यवहारासाठी कोणताही नवीन प्रोप्रायटरी कोड लागू करणार नाही.
 
5 एटीएममध्ये पैसे भरण्याचे नियम- बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे नियम मार्चमध्ये बदलणार आहेत. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना ATM मध्ये रोख रक्कम भरण्यासाठी लॉकेबल कॅसेट वापरण्याची अंतिम तारीख मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. सध्या, बहुतेक एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन्स) ओपन कॅश टॉप-अपद्वारे किंवा ऑन-द-स्पॉट मशीनमध्ये रोखीने भरले जातात. एटीएममध्‍ये रोख वितरीत करण्‍याच्‍या विद्यमान प्रणालीला दूर करण्‍यासाठी, आरबीआयने बँकांना एटीएममध्‍ये रोख भरण्‍याच्‍या वेळी केवळ लॉकेबल कॅसेट वापरण्‍याची खात्री करण्‍याचे निर्देश दिले आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments