Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

INCOMETAX रिटर्न चे नवे पोर्टल 7 जून रोजी सुरु होणार.

INCOMETAX रिटर्न चे नवे पोर्टल 7 जून रोजी सुरु होणार.
, रविवार, 6 जून 2021 (12:46 IST)
नवी दिल्ली. आयकर विभागाने शनिवारी सांगितले की ते 7 जून रोजी एक नवीन पोर्टल सुरू करीत आहेत, ज्यावर करदाता ऑनलाईन तपशील सादर करू शकतील. हे पोर्टल सबमिट केलेल्या तपशीलांच्या त्वरित प्रक्रियेच्या सुविधेशी जोडले जाईल आणि याद्वारे कर परताव्याची प्रक्रिया देखील लगेचच पूर्ण केली जाऊ शकते. 
 
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) एका प्रकाशनानुसार हे पोर्टल
www.incometax.gov.in 7 जून रोजी लाँच केले जाईल. यामुळे कर भरणाऱ्यांना तपशील देताना सहज होईल.
 
निवेदनात म्हटले आहे की, सीबीडीटी 18 जून रोजी नवीन कर भरणा प्रणाली देखील सुरू करणार आहे. पोर्टल लॉन्च झाल्यानंतर मोबाइल अॅप देखील जारी केले जाईल जेणेकरुन करदात्यांना त्याच्या विविध वैशिष्ट्यांसह परिचित होऊ शकतील.
 
अहवालानुसार नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू झाल्यानंतर करदात्यांना मोबाईलमधूनही कर परतावा भरता येणार आहे.
जुन्या पोर्टलवर त्यांना आधीपासून पगार, बचत इ. ची माहिती मिळाली होती, नवीन पोर्टलवर बचत करण्याशिवाय कोणत्याही प्रकारचे लाभांश (डिविडेंड), टीडीएस आणि इतर प्रकारच्या माहितीदेखील यापूर्वीच भरलेल्या मिळतील  यामुळे पगारदार आणि पेन्शनधारकांना आयकर विवरणपत्र भरणे सोपे होईल. पूर्वीच्या तुलनेत व्यापाऱ्यांना देखील पूर्वीपेक्षा अनेक प्रकाराची नवीन माहिती मिळेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संभाजीराजे यांचं मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून आंदोलन, रायगडावरून घोषणा