Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बस, ट्रेलर आणि मालवाहू अवजड वाहनांच्या आकार बदलणार

Indian vehicles
, शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:31 IST)
देशातील लॉजिस्टिक्सच्या क्षमतेत सुधारण्यासाठी केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या बस, ट्रेलर आणि मालवाहू अवजड वाहनांच्या आकारमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
जागतिक मानांकानुसार वाहनांची लांबी, रुंदी आणि उंचीत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९  संबंधित नियम ९३ मधील वाहनांच्या आकारात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांची लांबी जास्तीत जास्त ४ मीटर आणि उंची अडीच मीटर असेल. तीनचाकी वाहनांची उंची २.२.मीटरपासून ते २.५  मीटरपर्यंत असेल.
 
दोन अ‍ॅक्सल्सच्या बसची लांबी १२  मीटरवरून १३.५  मीटरपर्यंत विमानतळावरील प्रवासी बसेससाठी ३.८ मीटरची उंची असेल. तर एम श्रेणीतील वाहनांची उंची ३.८  मीटर ते ४ मीटरपर्यंत ठेवता येऊ शकते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकूण 38 हजार 900 कोटींच्या लढाऊ विमान आणि शस्त्रे खरेदीला मान्यता