Aprilia ने आपली आतापर्यंतची सर्वात स्वस्त स्कूटर Storm 125 लाँच केली आहे. या स्कूटरची ब्रेकिंग क्षमता उत्तम असावी यासाठी कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिमचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. ही नवी स्कूटर कंपनीच्या आधीच्या SR 125 या स्कूटरवर आधारित आहे. मॅट रेड आणि मॅट येलो अशा दोन रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध असेल. या स्कूटरमध्ये सिंगल बल्ब हेडलाइट युनिट,12-इंचाचे व्हिल्स आणि सीबीएससह ड्रम ब्रेक दिले आहेत. आधीपासून बाजारात असलेल्या SR 125 आणि SR 150 मध्ये कंपनीने दोन बल्ब सेटअप हेडलाइट दिली आहे. Aprilia Storm 125 ची एक्स शो-रुम किंमत 65 हजार रुपये इतकीठेवण्यात आली आहे. कंपनीच्या SR 125 या स्कूटरपेक्षा Storm 125 आठ हजार रुपयांनी स्वस्त आहे. एसआर 125 वापरलेल्या इंजिनचाच वापर यामध्ये करण्यात आला आहे. 125cc क्षमतेचं हे इंजिन 7, 250rpm वर 9.52PS ची पावर आणि 6, 250rpm वर 9.9Nm टॉर्क जनरेट करतं.