Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कांद्याचा लिलावच झाला नाही, शेतकऱ्यांने कांदा बाजार समितीबाहेर फेकला

onion
, गुरूवार, 13 एप्रिल 2023 (21:16 IST)
नाशिक : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत नेहमीप्रमाणे कांदा विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा लिलावच झाला नाही. त्यामुळे संतापलेलेल्या शेतकऱ्याने बाजार समितीतून बाहेर पडत कांदा ओतून देत संताप व्यक्त केला आहे. लाल कांद्याला ग्राहक नसल्याने व्यापारीही लिलावच पुकारत नसल्याने शेतकरी नाराज आहे.
 
उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागल्याने कांद्याची खरेदी जवळपास थांबली गेली आहे. मात्र, उशिरा लागवड केलेले लाल कांदे अद्यापही बाजारसमितीत येत आहे. लाल कांद्याचे ग्राहक नसल्याने व्यापारी ते खरेदी करत नाही. नाफेडकडूनही बरेच दिवस उलटून गेले खरेदी बंद आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी लाल कांदा आणला आहे त्याचा लिलावच पुकारला जात नाही.
 
चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील सचिन विठ्ठलराव गांगुर्डे आणि रवी किसन तळेकर यांनी लाल कांद्याचे पिक घेतले होते. त्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले दोन नंबर प्रतवारी असलेला लाल कांदा विक्रीस आणला होता. जवळपास तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टर मध्ये भरून तीन हजार रुपये खर्च करून कांदा  विक्रीसाठी आणला होता.
 
यावेळी कांदा उत्पादक शेतकरी यांनी रवी तळेकर यांनी आपण माझ्या लाल कांद्याचा लिलाव का केला नाही ? अशी विचारणा व्यापाऱ्यांना केली असता या कांद्याला ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापारी लिलावासाठी पुढे निघून गेले. काहीतरी बाजारभावाने लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र लिलाव झाला नाही. त्यामुळे  घरी नेऊन घरच्यांचा संताप करण्यापेक्षा बाजार समितीच्या आवाराबाहेर काही अंतरावर शेतकऱ्यांनी कांदे ओतून दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर