देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही सेवा आज आणि उद्या विस्कळीत होतील.एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ही माहिती ग्राहकांना दिली.
एसबीआयने ट्विट केले की,“सिस्टम मेंटेनन्समुळे 16 आणि 17 जुलै रोजी बँकेच्या काही सेवा बंद राहतील.या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग,योनो,योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असणार. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीटद्वारे म्हटले आहे की 16 आणि 17 जुलै दरम्यान मध्यरात्री सेवा बंद राहतील. ते म्हणाले की,रात्री 10.45 ते रात्री 1.15 या वेळेत सेवा उपलब्ध नसतील.
याचे कारण असे की, बँक आपले यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल.जेणे करून ग्राहक अनुभव अधिक चांगले करता येतील.या कालावधीत ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार बंद राहणार.
तसे,आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, एसबीआयने कोणतीही सेवा थांबविण्याची ही पहिली वेळ नाही.यापूर्वी बँकेने 3 जुलै रोजी पहाटे 3:25 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:50 मिनिटे म्हणजेच 4 जुलै रोजी पहाटे पर्यंत सेवा बंद केल्या होत्या.
देशभरात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 22 हजाराहून अधिक शाखा आहेत.31 डिसेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार, इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या 8.5 कोटी आहे, तर मोबाइल बँक ग्राहकांची संख्या1.9 कोटी आहे. यूपीआयच्या ग्राहकांची संख्या 13.5 कोटीहून अधिक आहे.बँकेद्वारे या सेवा बंद केल्यामुळे बर्याच ग्राहकांची गैरसोय होऊ शकते.