Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बिकिनी एअरलाइंसची सेवा भारतात सुरू होणार

बिकिनी एअरलाइंसची सेवा भारतात सुरू होणार
प्रत्येक एअरलाइंसची एअरहोस्टेस आणि त्यांची युनिफॉर्म केवळ एअरलाइंसची ओळख नसून प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र असतं. एवढंच नव्हे तर काही एअरलाइंस त्या देशातील संस्कृतीची ओळख करवतात. परंतू काही एअरलाइंस मार्केटिंग स्टेट्रजी अंतर्गत असे ड्रेस डिझाइन करवतात की त्यांच्या प्रवाशांची संख्या वाढत जाते.
 
अशीच एक एअरलाइंस आहे बिकिनी एअरलाइंस, ज्याची सेवा भारतामध्ये सुरू होणार आहे. व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी व्हिएटजेट कंपनीची विमानसेवा लवकरच भारतात सुरू होणार आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
व्हिएटजेटची विमानसेवा जगभरात बिकिनी एअरलाइंस म्हणूनही ओळखली जाते कारण यात एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसून येतात. या बोल्ड पाउलामुळे ही सेवा नेहमीच विवादात असते. मात्र त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतो.
 
दिल्ली ते व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. उल्लेखनीय आहे की ही विमानसेवा दुनियेत आपल्या कॅलेंडरसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लोकं व्हिएटजेटच्या सेक्सी कॅलेंडर्सची वाट बघत असतात. कंपनीप्रमाणे ही डायरेक्ट फ्लाईट्स असून यासाठी कुठलीही फ्लाईट बदलावी लागणार नाही.
 
या एअरलाइंसच्या एअरहोस्टेसचा ड्रेस कोड कंपनीच्या सीईओ Nguyen Thi Phuong Thao यांनी निवडला असून त्या व्हिएतनामची प्रथम अब्जाधीश महिला उद्यमी आहेत. अलीकडेच ही एअरलाइंस एका फुटबॉल टीमच्या स्वागतासाठी एअरहोस्टेसला लिंगरीमध्ये प्रदर्शित करण्यामुळे चर्चेत होती. आता बघायचे आहे की भारतात या सर्व प्रकारावर काय प्रतिक्रिया मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय पुन्हा ६५