Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘विस्टाडोम’ असलेली बोगी सेवेत दाखल

Webdunia
पर्यटकांना आकर्षित करणारी अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘विस्टाडोम’ (काचेचे छत असणारी) बोगी रविवारी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. संपूर्ण वातानुकूलित असणा-या या बोगीमध्ये पारदर्शी काचेच्या विस्तृत खिडक्या आहेत.

तामिळनाडूमधल्या चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) विस्टाडोम बोगी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गसौंदर्य, दरी, घाट यांचे निरीक्षण करण्यासाठी ‘आॅब्जर्वेशन लाउंज’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या लाउंजमधून पर्यटकांना विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे.

त्याचबरोबर छतावरही बहुतांशी भागात काच असल्यामुळे निसर्गप्रेमींना विस्टाडोमचा प्रवास म्हणजे सृष्टी-सौंदर्य न्याहाळण्यासाठी ‘पर्वणी’ ठरणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी या कोचमध्ये साहित्य ठेवण्यासाठी विशेष रॅकची व्यवस्था आहे.
 
विस्टाडोम बोगीत ४० इतकी आसनव्यवस्था पूशबॅक आणि रोटेड (१८० अंश कोनात फिरणारे) स्वरूपातील आहे. या आसनव्यवस्थेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना या कोचचे विशेष आकर्षण आहे. या बोगीचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय या बोगीत जीपीएस यंत्रणा, १२ एलसीडी लाइट, एक लहान आकाराचा फ्रीज, ओव्हन, ज्यूसर ग्राइंडर अशादेखील सुविधा असणार आहेत. आधुनिक बनावटीचे स्वच्छ स्वच्छतागृह हेदेखील विस्टाडोमचे वैशिष्ट्य आहे. विशाखापट्टणम ते आरकू या हिल स्टेशनवर अशा प्रकारच्या बोगी धावत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments