वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे. वेदान्त प्रकल्पावरून आशिष शेलार यांनी २ ट्वीट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी १०% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल्याची आठवण शेलार यांनी करून दिली.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये वेदान्त-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? १० टक्के नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे. असे मत आशिष शेलार व्यक्त केलं आहे.