आता व्हॉट्सअॅप कंपनीला पेमेंट बँक सुरु करायचे आहे. त्यासाठी देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवानगी मागितली आहे. मात्र आरबीआयने अद्याप याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप कंपनीला पेमेंट बँक केव्हा सुरु होणार याकडे युजर्सचे लक्ष लागले आहे.
व्हॉट्सअॅपला भीम – यूपीआयबरोबर जोडून आम्हाला पेमेंट बँक सुरु करायची आहे. पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना उपयुक्त आणि सुरक्षित अशी सेवा द्यायची आहे. त्यामुळे सरकारचे वित्तीय तसेच डिजिटल सक्षमीकरणाला मदत होऊन युजर्सना याचा फायदा होणार आहे. याबाबतचे पत्र नुकतेच व्हॉट्सअॅपचे प्रमुख क्रिस डॅनिअल यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिले आहे.