Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योगगुरू बाबा रामदेवकडून ई कॉमर्स पोर्टल लाँच ‘ऑर्डर मी’

Baba Ramdev
, शुक्रवार, 15 मे 2020 (20:35 IST)
बाबा रामदेव यांच्या कंपनीनं ‘ऑर्डर मी’ या नावानं वेबपोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोर्टलवर पतंजलीशी निगडीत उत्पादनांच्या विक्री करण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्य स्वदेशी उत्पादनांचीदेखील विक्री करण्यात येईल. याद्वारे विक्री करण्यात येणारी उत्पादनं ऑर्डर केल्यानंतर काही तासांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसंच घरपोच सेवाही मोफत दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इतकंच नाही तर या पोर्टलद्वारे मोफत वैद्यकीय सल्लादेखील देण्यात येणार आहे. पतंजलीशी निगडीत १ हजार ५०० जणांना याद्वारे संपर्क साधता येणार आहे. या महिन्याच्याच अखेरिस हे पोर्टल लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ऑर्डर मी या पोर्टलवर केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री केली जाणार आणि त्यांचाच प्रचारही केला जाईल. सर्व स्थानिक रिटेलर्स आणि छोट्या दुकानदारांना जोलं जाईल आणि स्वदेशी उत्पादनांची विक्री कशी वाढवता येईल याचा विचार गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निसानचा बजेट कार लाँच, असे आहेत फिचर