केक हे ऐकूनच तोंडाला पाणी येतं. केक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाचं आवडतो. आज आम्ही आपल्याला चॉकलेट केक बनविण्याची रेसिपी सांगत आहोत आपण नक्की बनवा आणि आपल्या बालचमूंना खुश करा. चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
साहित्य -
1 कप मैदा, 2 मोठे चमचे क्रीम, 2 कप पिठी साखर, 1/2 चमचा मीठ, 1 लहान चमचा बेकिंग सोडा, 1 मोठा चमचा ऑरेंज इसेन्स, 1 मोठा चमचा लोणी, 1 कप दही, 1 कप कोको पावडर.
आयसिंगसाठी साहित्य- 3 मोठे चमचे लोणी, 1/4 कप कोको पावडर, 3 मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, 1 कप आयसिंग साखर.
कृती -
सर्वप्रथम मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग सोड्याला चाळून घ्या. एका भांड्यात दही, लोणी, इसेन्स घालून चांगले फेणून घ्या. क्रीम मध्ये हळू -हळू पिठी साखर घाला.
दही देखील त्यात फुगे/बबल येई पर्यंत फेणून घ्या. आता या मध्ये मैद्याचे मिश्रण टाकून फेणून घ्या. केक च्या पात्राला तूप लावा, त्यावर मैदा भुरभुरा. या फेणलेल्या घोळाला केक पात्रात घाला. प्रीहिटेड ओव्हन मध्ये ठेवून कमी तापमानात किमान 30 -40 मिनिटे बॅक करा. चविष्ट चॉकलेट केक खाण्यासाठी तयार. थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवा. नंतर ताटलीत काढून त्याचे काप करून सर्व्ह करा.