Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री सरिता मेहेंदळे एका गोंडस मुलाची आई झाली

Actress Sarita Mehendle
, शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (11:10 IST)
facebook
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'भागो मोहन प्यारे' चांगलीच गाजली होती. या मालिकेत मधुवंती नावाच्या भुताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सरिता मेहंदळे ही एका गोंडस मुलाची आई झाली आहे. अभिनेत्रीने 1 जानेवारी 2024 रोजी एका मुलाला जन्म दिला. तिने 'इट्स या बॉय' लिहून फोटो शेअर केला आहे. तर कॅप्शन मध्ये तिने मुलाच्या जन्माची तारीख लिहिली आहे. 

अभिनेत्रीने दोन महिन्यांपूर्वी पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत आई होणार अशी आनंदायी बातमी दिली. आता अभिनेत्रीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मांनंतर अभिनेत्री सरिता व तिचे पती सौरभ जोशी खूपच आनंदात आहे. त्यांना लग्नाच्या पाच वर्षांनंतर अपत्य झाले आहे. सरिताच्या आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर ही बातमी शेअर केली आहे. तिच्या पोस्टवर चाहते आणि इतर कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.  

अभिनेत्रीने अनेक मालिका व नाटकांमध्ये काम केलं आहे. तिने कन्यादान, सरस्वती या मालिकेत काम केलं आहे तर नाटक अर्धसत्य मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या सह काम केलं आहे. 
 
  Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dulhania 3: जान्हवी कपूर 'दुल्हनिया ३' मध्ये आलिया भट्टची जागा घेणार ?