Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम 'नाजूका'

Webdunia
शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (14:20 IST)
विघ्नहर्त्याचा आशीर्वाद लाभला कि, पुढचा मार्ग सहजसोपा होतो असे म्हणतात. त्यामुळे, अनेकजण आपल्या कामाची सुरुवात गणपती उत्सवापासून करणे पसंत करतात. आपल्या सर्वांच्या लाडक्या नाजूकानेदेखील आपल्या आगामी सिनेमाची दमदार सुरुवात या दिवसांपासून केली आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' चित्रपटातील नाजुका आपल्या अगडबम रुपात, प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्यास त्यांच्या शहरात येणार आहे. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या या गणरायाचा आशीर्वाद घेण्याबरोबरच, तिथल्या प्रेक्षकांसोबत ती संवाददेखील साधणार आहे. इतकेच नव्हे तर, महराष्ट्रातील काही महत्वाच्या शहरांमध्ये ‘माझा अगडबम’सिनेमातील या नाजुकाच्या ३५ फुट उंच कटआऊटचे यादरम्यान उद्घाटन केले जाणार आहे. प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणाऱ्या या भव्यदिव्य कटआऊटमुळे, ठिकठिकाणी उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला चांगलाच रंग चढणार आहे.
 

राज्यभरातील विविध सार्वजनिक मंडळांमध्ये स्थानापन्न झालेल्या भव्य गणेशमूर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या स्थानिकांना अगडबम रूपातली नाजुकादेखील तिथे भेटणार असल्याकारणामुळे, यंदाच्या उत्सवाला जत्रेचे स्वरूप लाभणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने साकारलेली 'नाजूका' या व्यक्तिरेखेने यापूर्वीदेखील 'अगडबम' सिनेमाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘माझा अगडबम’या सिक्वेलमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ती पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.  या सिनेमाचे लेखन, आणि दिग्दर्शन तृप्तीनेच केली असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे.  त्यामुळे, मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या या अगडबम नाजुकाला, आपल्या शहरात प्रत्यक्ष भेटण्यासाठी प्रेक्षकदेखील नक्कीच उत्सुक असतील हे निश्चित !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांनी आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली

लेह लडाख मधील ४ प्रमुख पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

शिल्पा शिरोडकर Covid Positive, पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हे असेच एक नाव आहे ज्यांनी प्रसिद्धीसाठी २० वर्षे केला संघर्ष

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments