Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका रंगकर्मी ने लिहिलेले हे पुस्तक रंगभूमीला आणि कलाकाराला.....

Webdunia
सोमवार, 4 सप्टेंबर 2017 (14:02 IST)
जीवनात स्वतः प्रेरणा असणे आणि आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना, समाजाला, राष्ट्राला आणि जनमानसाला प्ररित करणे म्हणजेच आपल्या जीवनात, आपण जिवंत असण्याचा अर्थ व्यक्तीला कळतो. थियेटर ऑफ रेलेवंस नेहमी व्यक्तीला स्वताला प्रेरित होण्यास शिकवते. त्याच बरोबर इतरांना सकारात्मक दृष्टीने प्रेरित होण्याचे मार्ग दाखवते. ज्यामुळे सकारात्मक वादळाचे वारे वाहू लागतात. असाच हा आगळा- वेगळा अनुभव थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये मला आला , स्वताला सिद्ध करण्यासाठी अश्विनी नांदेडकर ( स्माईली ) पाच वर्षा पासून प्रवास  करत आहे. ती सतत थियेटर ऑफ रेलेवंस प्रक्रियेमध्ये आहे. व्यक्ती म्हणून स्वप्नांचा ध्यास ...घेण्यास सुरुवात केली. आणि एक सशक्त व्यक्ती म्हणून आज या रंगभूमीवर एक सशक्त कलाकार आहे  त्याच बरोबर, एक सक्षम व्यक्ती म्हणून उभी आहे. जीवनात येणाऱ्या अनुभवांना  दिशा देत आहे.
 
एक कलाकार म्हणून सतत स्वताला आवाहन करत, एक सक्षम व्यक्ती म्हणून जीवन जगत आहे ... याच जडण- घडणाचा प्रवास तिने पुस्तकात लिहायला सुरुवात केली आहे . एका रंगकर्मीचा चा प्रवास या पुस्तकात आपल्याला पहायला मिळणार आहे. वाचायला मिळणार आहे. या पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट आम्ही २९ ते ३१ ऑगस्ट २०१७ ला शांतीवन, पनवेल येथे झालेल्या थियेटर ऑफ रेलेवंस च्या  कार्यशाळेत वाचायला मिळाला आणि ऐकायला मिळाला. या जीवनाला मार्ग दाखवणाऱ्या अश्विनी नांदेडकर ( स्माईली) च्या पुस्तकाच्या वाचनात मला आलेले अनुभव....
पुस्तकाच्या पहिल्या ड्राफ्ट मध्ये वाचत असताना पुस्तकाची भाषा सहज आणि सोपी वाटली . नवीन – नवीन शब्द कानावर पडत होते. व्यक्ती बनण्यापासून सुरुवात झाली . त्यामध्ये स्वताचे निर्णय घेणे, विचारांना समजून घेणे, स्वताचे  मत मांडणे , स्वतः साठी नवीन विचारांची सोबत घेऊन जीवनाला सकारात्मकतेने पाहणे ..असा हा प्रवास दिसतो. मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक छेड़छाड़ क्यों ? पासून झालेली सुरुवात . स्वताला स्वता: बद्दल विचार करायला प्रेरित करते . त्याच बरोबर मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित नाटक गर्भ, या नाटकामध्ये स्वताच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रेरित केले . वेग - वेगवेगळ्या धर्मांचे कपडे काढत माणूस म्हणून जगायला, विचार करायला दिशा दाखवली . याच प्रवासात अश्विनी थियेटर ऑफ रेलेवंस प्रक्रियेत जबाबदारी घेण्यास सुरुवात करते आणि स्वताला आणि आपल्यातील कलाकाराला भक्कम करते आणि जडण – घडणाचा प्रवास करते . मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटकाद्वारे युरोप पर्यंत प्रवास करते . एका गृहिणी पासून सुरुवात झालेली हि यात्रा तिला थेट साता समुद्रा पलीकडे घेऊन जाते आणि एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करते . आपल्या नाटकाद्वारे आणि थियेटर ऑफ रेलेवंस प्रक्रीये द्वारे सकारात्मक परिवर्तन आणते. “अनहद नाद – unheard sounds of universe” या मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या  नाटकाच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या उन्मुक्त्तेचा प्रवास दाखवते. अशी या पुस्तकात वेगवेगळ्या विचारांनी सजलेली यात्रा पहायला मिळते . शब्द वाचत असताना डोळ्यासमोर चित्रपट सुरु असल्यासारखं वाटत. असा हा  अश्विनी चा सुंदर प्रवास पहायला मिळतो, आणि पुस्तक वाचत असताना चेहऱ्यावर  तेज आपो-आप येऊन जाते . त्याच बरोबर सकारात्मक दृष्टी अंतर्मनात निर्माण होते . एका रंगकर्मी ने लिहिलेले हे पुस्तक रंगभूमीला आणि कलाकाराला कले बद्दल पवित्र आणि शुद्ध नजरेने पाहण्याची दिशा दाखवते . एक कलाकार म्हणून मी या पुस्तकाची वाट पाहत आहे . जे रंगकर्मीला नवीन रंग दृष्टी देण्यास कार्य करणार आहे . थियेटर ऑफ रेलेवंस ची हि प्रक्रिया व्यक्तीला सक्षम करण्याबरोबर आपल्या अनुभवांना शब्द रूपाने या जगामध्ये पुस्तकात मांडण्यासाठी प्रतिबद्द करत आहे . त्याच बरोबर स्वप्न दाखवत आहे . माझ्या सारख्या कलाकाराला तुही पुस्तक लिहू शकतोस म्हणून .....
सलाम , आहे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांना ज्यांनी थियेटर ऑफ रेलेवंस हे तत्व १९९२ पासून या जगात सुरु केलं. जे व्यक्तीला व्यक्तीच्या भोवती असणाऱ्या भौतिक कठीण परिस्थितीला तोडून उन्मुक्ततेचा प्रवास करायला शिकवते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित 'रानटी' चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

गेमिंगचा देव हिदेओ कोजिमा यांनी YRF स्पाय युनिव्हर्सच्या टायगर 3 चे कौतुक केले, म्हटले - अविस्मरणीय मनोरंजन!

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

पुढील लेख
Show comments