Marathi Biodata Maker

Planet Marathi : Baap Beep Baap : वडील मुलाचे नाते बहरण्यासाठी 'वय नाही'

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (16:34 IST)
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील 'बाप बीप बाप' या वेबसीरिजमधील वडील - मुलाच्या नात्यातील सुंदर प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या वेबसीरिजमधील 'वय नाही' हे धमाल गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जात, एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे.  
 
'बाप बीप बाप'मध्ये वडिलांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे संगणक हाताळताना, व्यायाम करताना, आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांमध्ये मिसळताना, मुलाच्या रिलेशनशिपला स्वीकारताना दिसत आहेत. ते ज्या ज्या गोष्टी करत आहेत त्यातून दिसतेय की, वय हा केवळ एक आकडा आहे. मुलांशी समवयस्क होऊन वडिलांनी त्यांच्याशी जवळीक साधली तर हे नाते अधिक बहरू शकते, अशा पद्धतीचे हे गाणे आहे. हे गाणे प्रत्येक पालकाने ऐकावे, असे आहे. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे.
 
'वय नाही'या गाण्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' हे एक धमाल गाणे असून वडील -मुलाच्या नात्याला एक नवे वळण देणारे हे गाणे आहे. वडील - मुलाच्या नात्यात नाही म्हटले तरी एक दरी असते. ही दरी मिटवून हे नाते अधिक घट्ट करण्याचा आणि या अबोल नात्यावर भाष्य करणारे 'वय नाही' हे गाणे आहे. प्रत्येक पाल्य -पालकाने पाहावी अशी ही वेबसीरिज आहे.''

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

कृति सेनन आजच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक का आहे ते जाणून घ्या?

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला

"यादव जी की लव्ह स्टोरी" मुळे वाद निर्माण झाला, संभलमध्ये हिंसक निदर्शने, चित्रपटाचे पोस्टर जाळले

धुरंधर 2' च्या शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन, बीएमसीने आदित्य धरच्या स्टुडिओला ब्लॅकलिस्ट केले

गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले

पुढील लेख
Show comments