नशेचा खेळ काही दिवसांचा… एक झटका आणि...
प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा नजराणा आणत असते. दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, सांगितिक मैफल असे मनोरंजनाचे विविध पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. इथे प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट विषयांचे लघुपटही पाहायला मिळतात. प्लॅनेट मराठी ओटीटीने उत्तम दर्जाचे आणि अनेक पुरस्कार प्राप्त केलेले लघुपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले आहेत आणि प्रेक्षकांनी या लघुपटांचा आनंद लुटला आहे. आता असाच 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' नावाचा रहस्यमय आणि सामाजिक संदेश देणारा लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तिचे आयुष्य अखेर कोणत्या वळणावर जाते, यावर भाष्य करणारा हा लघुपट आहे. आता नशेत गुरफटलेला हा तरूण कसा बाहेर येतो, हे आपल्याला लघुपट पाहिल्यावरच समजेल.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सर्व प्रकारचा कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. लघुपट हा त्याचाच एक भाग आहे. उत्तमोत्तम लघुकथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक संदेश देणारा लघुपट 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' हा लघुपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. एखाद्या वाईट गोष्टीतून बाहेर पडायला एखादा झटकाही पुरेसा असतो. लघुपटाचा विषय जरी सर्वसामान्य असला तरी कथेची मांडणी, सादरीकरण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
पॅराबिग फिल्म्स प्रस्तुत, नीरज जोशी दिग्दर्शित या लघुपटाची कथा, पटकथा आणि सवांद ओमकार वेताळ यांचे आहेत.