Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhirkit- विनोदाच्या बादशहांचा 'भिरकीट'

Webdunia
बुधवार, 11 मे 2022 (16:02 IST)
क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल निर्मित 'भिरकीट' या चित्रपटाचे नवीन आणि धमाल पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अनुप जगदाळे यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहे. जबरदस्त कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या १७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 
 
'भिरकीट'ची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट आहे. पोस्टरमध्ये सगळेच विनोदवीर एकत्र दिसत असून हा चित्रपट धमाका उडवणार हे नक्की. सध्यातरी चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे, याचा अंदाज येत नसला तरी 'भिरकीट' प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण तनवीर मिर यांनी केले असून संकलन फैजल महाडिक यांचे आहे. तर शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे 'भिरकीट'ला संगीत लाभले आहे. युएफओने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे. 
  
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, '' या चित्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हाच अनेकांनी 'भिरकीट' म्हणजे नक्की काय? असे विचारले होते. प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न आहे नक्की काय विषय आहे हा? तर हळूहळू 'भिरकीट' म्हणजे काय हे प्रेक्षकांना कळू लागेल. सध्या एकाच सांगू शकेन हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटात इतके दमदार कलाकार आहेत. सगळेच विनोदाचे बादशाह आहेत. त्यामुळे तुफान धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.''

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

पुढील लेख
Show comments