Marathi Biodata Maker

अनुजा ठरली 'दादा एक गुड न्युज आहे' ची पहिली प्रेक्षक

Webdunia
बुधवार, 19 डिसेंबर 2018 (10:39 IST)
बहीण भावाच्या नि: स्वार्थ नात्याची हळवी गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून  लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन नाटकाशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होते. ह्याच स्पर्धेच्या विजेत्याचं नाव आता  जाहीर करण्यात आले आहे. अनुजा चव्हाण ही ह्या स्पर्धेची भाग्यशाली विजेता ठरली असून ह्या नाटकाची ती पहिली प्रेक्षक देखील ठरली आहे. अनुजा ही ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. अनुजाला दादा, एक गुड न्युज आहे या नाटकाचे तिकीट ह्या नाटकातील कलाकार दस्तुरखुद्द उमेश कामात, ऋता दुर्गुळे, दिग्दर्शक अद्वैत दादरकर, लेखिका कल्याणी पाठारे आणि ह्या नाटकाची सादरकर्ती प्रिया बापट ह्यांच्या हस्ते देण्यात आले. प्रिया बापट सादर करीत आहे  सोनल प्रोडक्शन निर्मित आणि  कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर ह्यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये ह्यांनी सांभाळले आहे. शिवाय आरती मोरे, ऋषी मनोहर ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

नवीन

Maniesh Paul Mother Death मनीष पॉल यांच्या आईचे दुःखद निधन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

पुढील लेख
Show comments