Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डीजेवाला दादा गाजतोय !

DJ wala dada hit
डीजेवाला दादा गाजतोय !
डीजेवाला दादा सोशल मिडीयावर हिट !
डीजेवाला दादा गाण्याची तरुणाईत क्रेझ !
DJ wala dada hit
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात  एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. 'डीजे वाला दादा' असे नव्या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
 
व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत आणि राज एक्स्लेन्सी क्रिएशन असलेल्या या गाण्यात नवोदित अभिनेत्री  दिपाली सुखदेवे हिने भन्नाट डान्स केला आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. या गाण्याची सोशल मिडीयावर प्रचंड क्रेज पाहायला मिळत आहे. 
DJ wala dada hit
सद्यस्थितीत डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी - मराठी गाणी आली असली तरी गीतकार कौतुक शिरोडकर  यांनी लिहीलेले गाणे थोडया वेगळ्या धाटणीचे आहे. सुप्रसिध्द  गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनी 'डिजेवाला दादा' हे गाणे संगीतबद्ध केले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृताने केला विशेष मुलांसोबत 'ख्रिसमस' साजरा