Marathi Biodata Maker

पाचशे वर्षे येथे होतात कॅशलेस व्यवहार

Webdunia
भारतात कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक मार्ग चोखाळत असतानाच देशातील मागास मानल्या जाणार्‍या आसाम राज्यातील एका छोट्या गावात गेली पाचशे वर्षे कॅशलेस व्यवहार केले जात आहेत हे ऐकून नवल वाटेल. पण हे सत्य असून गोवाहाटीपासून ३२ किमीवर असलेल्या एका छोट्या गावात दरवर्षी लागणार्‍या मेळ्यात तिवा जमातीचे लोक सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करतात व ही परंपरा १५ व्या शतकापासून सुरू असल्याचे समजते.
 
मध्य आसाम व मेघालय मधील तिवा समाज मोरी गावांत दरवर्षी जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार्‍या तीन दिवसांच्या मेळ्यासाठी किंवा जत्रेसाठी उपस्थित असतो. हा मेळा नुकताच पार पडला व यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हेही या मेळ्यात आले होते. या मेळ्याला जुनबील मेळा असे नांव आहे. मेळ्याच्या समितीचे सचिव जरसिंह बोरदोलाई म्हणाले येथे येणारे व्यापारी व ग्राहक खरेदीविक्रीसाठी पैसा वापरत नाहीत तर वस्तू देवाणघेवाणीतून हे व्यवहार केले जातात. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करताना दुकानदाराला आपल्याजवळची त्या किमतीची दुसरी वस्तू द्यायची.
 
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या मेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात हा मेळा कायम सुरू राहू शकेल व पर्यटनाला चालना मिळेल अशी अ्रपेक्षा आहे. या समाजाच्या लोकांकडून भारतवासियांनी शिकावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: महायुतीच्या पाठिंब्याने सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले

पुणे हत्या प्रकरणात केतनला ढकलण्यापूर्वी सियाने त्याचा फोन मागितला, पोलिसांच्या तपासात आढळले

मेथी कमी कालावधीत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक

हॉलंडच्या करिष्यमा मुळे नॉर्वेला आपला पहिला फिफा विश्वचषक बाद फेरीचा सामना जिंकला

महाराष्ट्राचे ११ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- आधुनिक तंत्रज्ञान यशाची खात्री देईल

पुढील लेख
Show comments