5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त
पुरोगामी माणुसकीने समृद्ध आणि सर्वसमावेशक मराठी रंगभूमीसाठी "थिएटर ऑफ रेलेवन्स" शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी" वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, पनवेल येथे 5 नोव्हेंबर 2022 शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता, प्रस्तुत करणार आहेत.
नाटक: गोधडी
रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”
"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!
कुठे : वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, #पनवेल
कधी : 5 नोव्हेंबर 2022 , शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता
लेखक आणि दिग्दर्शक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज
कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले, संध्या बाविस्कर, आरोही बाविस्कर आणि अन्य कलाकार.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.
Edited by : Tushar Mhaske