Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक-अर्जुन जोडीच्या जीसिम्सच्या यशाचे पंचसूत्र

Webdunia
शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (15:17 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध सिनेमा तसेच जाहिरातींचे वितरण व निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या जीसिम्स संस्थेने, आपल्या कार्यकाळात अनेक उपक्रम राबविले आहेत. जीसिम्सचे खंदे शिलेदार अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशानदार या जोडीने आपल्या संस्थेअंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आयाम रोवला आहे. नवीन होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच, चित्रपटाचे व्यवस्थापन व विपणन, उपग्रह एकत्रीकीकरण तसेच दूरध्वनी मालिका आणि चित्रपटांच्या निर्मितीचे कामदेखील जीसिम्स करते. 
 
या संस्थेने चित्रपटाच्या व्यवस्थापन आणि विपणन कार्यात आतापर्यंत एकूण ३० मराठी चित्रपटांची यशस्वी धुरा सांभाळली आहे. ज्यात मितवा, प्यारवाली लव्हस्टोरी,फ्रेंड, वृंदावन, फुगे, लपाछपी आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या 'भिकारी' या सिनेमांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकताना फुगे या बहुचर्चित सिनेमापासून त्यांनी सुरुवात केली असून, आगामी 'तुला कळणार नाही' हा सिनेमा देखील' जीसिस्म' 
निर्मितीसंस्थेअंतर्गत लवकरच प्रदर्शित होत आहे. तसेच वायकोमची संयुक्त निर्मिती असलेल्या 'वारस' या सिनेमाचीदेखील लवकरच घोषणा केली जाणार आहे. 
 
मराठीच्या मोठ्या पडद्यावर यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या कार्तिक - अर्जुनच्या या जोडीने छोट्या पडद्यावरील निर्मितीमध्येदेखील आपली विशेष मोहोर उमटवली आहे. ज्यात 'कोण होईल मराठी करोडपती', 'इमा मराठी संगीत पुरस्कार' या कार्यक्रमाचा समावेश होतो, तसेच लक्स झकास नायिका पाहिले पर्व आणि फेअर एंड लवली नायिका दुसरे पर्व या दोन टेलेंट शोची  निर्मितीसुद्धा केली आहे.   
 
मराठी सिने तसेच जाहिरात जगतातील विपनन आणि निर्मितीक्षेत्रात आपले बहुमुल्य योगदान देणारी जीसिम्स मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोन प्रसिद्ध कलावंताचे जनसंपर्कदेखील करते. मराठी सिने वर्तुळात त्यांची कारकीर्द मोठी असून, नियोजनबद्ध कामामुळे कार्तिक-अर्जुन जोडीने व्यवस्थापन आणि निर्मिती क्षेत्रात आपले विशेष स्थान प्रस्थापित केले आहे. भविष्यात देखील त्यांचा हा कार्यकाल अविरत चालू राहणार असून, जीसिम्सअंतर्गत अनेक कालाक्र्ती सादर करत रसिकांचे मनोरंजन करण्याचा आमचा मानस असल्याचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन स्पष्ट करतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

पुढील लेख
Show comments