Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'के दिल अभी भरा नही' ची २५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

Webdunia
बुधवार, 15 मे 2019 (10:25 IST)
उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा मांडणारे नाटक मंडळी निर्मित 'के दिल अभी भरा नही' हे विनोदी नाटक लवकरच २५० व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल करत आहे. १९ मे रोजी बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता हा प्रयोग संपन्न होणार असून सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध जोड्या या वेळी उपस्थित राहणार आहेत. मंगेश कदम दिग्दर्शित आणि शेखर ढवळीकर लिखित या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 
 
वयाची पन्नाशी गाठल्यानंतर नवऱ्या- बायकोत उडणारे छोटे, मोठे, आंबट, गोड खटके, इतकी वर्षं संसार केल्याने नात्यात आलेली परिपक्वता, सुखदुःखात एकमेकांना दिलेली साथ थोड्याबहुत प्रमाणात प्रत्येक घरात पाहायला मिळते. प्रत्येक घरातील या खऱ्या आयुष्याचा वेध घेणारे 'के दिल अभी भरा नही' हे नाटक म्हणूनच प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटते. नवराबायकोच्या उतारवयातील नात्यावर भाष्य करणारे हे नाटक या वयात एकमेकांसाठी आवश्यक असलेल्या भावनिक गरजेचे महत्त्वही अधोरेखित करणारे आहे.
 
यशस्वी २५० वा प्रयोग पाचशेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या नाटकाच्या सादरीकरणात काही बदल करण्यात आले आहेत. अर्थात नाटकाचा गाभा तोच असून प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार असल्याची खात्री नाटकाच्या संपूर्ण टीमकडून देण्यात आली आहे. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या सहज, सुंदर अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत. याव्यतिरिक्त या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांनीही दमदार अभिनय केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री अथिया शेट्टीने बॉलिवूडला निरोप दिला

तुम्हाला नेचर फोटोग्राफीची आवड आहे का? तर दिल्ली-एनसीआरमधील या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

सलमानच्या सुरक्षेत त्रुटी, दोन दिवसांत दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसले,रक्षकांनी पकडले

कपील शर्मा फेम कलाकाराचे निधन

संत मुक्ताबाईं समाधी मंदिर मुक्ताईनगर

पुढील लेख
Show comments