Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

प्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या लालन सारंग यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या लालन सारंग यांचे निधन
, शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (12:00 IST)
प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग (७९) यांचे वृद्धापकाळात निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. सामना, हा खेळ सावल्यांचा, महेक अशा सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सखाराम बाईंडर, रथचक्र, कमला या नाटकांतमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका खास होत्या. यासोबतच त्यांनी स्टील फ्रेम आणि अशा या दोघी नाटकातही काम केलं. त्यांनी नाटकामागील नाट्य हे पुस्तकही लिहिलं होतं.
 
प्रसिद्ध निर्माते कमलाकर सारंग हे त्यांचे पती तर तनुश्री-नाना वाद प्रकरणातील दिग्दर्शक राकेश सारंग हा त्यांचा मुलगा. लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता . पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' ने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला