Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LOCHYA ZALA RE : सिद्धार्थ, अंकुशचा होणार लोच्या

Webdunia
शनिवार, 22 जानेवारी 2022 (16:02 IST)
प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे यांचा 'लोच्या झाला रे' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे टिझर नुकतेच  सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून यात आपल्याला अंकुश, सिद्धार्थ व वैदेही यांच्यात चाललेला गोंधळ दिसून येत आहे. एकीकडे विजय पाटकर यांची जुगलबंदी तर दुसरीकडे सयाजी शिंदे व रेशम टीपणीस  यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. सगळ्यांचाच हा गोंधळ आणि पळापळ कशासाठी सुरु आहे, कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे. या सगळ्याचीच उत्तरे आपल्याला ४ फेब्रुवारीला मिळणार आहेत. 
 
'लोच्या झाला रे'चे  चित्रीकरण लंडनमध्ये झाले असून टीझरमध्ये अवघ्या लंडनची सफर घडत आहे. सुमारे एक महिना या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये पार पडले. तिथल्या सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह इतर टीमलाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते . कधी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी यामुळे कलाकारांसोबत संपूर्ण टीमला अनेक कसरती कराव्या लागल्या. 
 
‘ल्योचा झाला रे’च्या लंडनमधील चित्रीकरणाच्या अनुभवाबाबत दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’मला वैदेही आणि सिद्धार्थचे विशेष कौतुक करावेसे वाटते कारण लंडनमधील कडाक्याची थंडी पाहता, वैदेहीचा भूमिकेला अनुसरून असलेला पेहराव तेथील थंडीला अनुकूल नसल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तरी ब्लॅंकेटचा सहारा घेत तिने संपूर्ण शूटिंग उत्तमरित्या पार पाडले. सिद्धार्थचेही बरेच सीन्स हे शॉर्ट्समध्ये असल्याने त्यालाही थंडीचा सामना करावा लागला. मात्र कोणीही तक्रार केली नाही. या चित्रपटात कलाकारांनी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढीच मेहनत पडद्या मागील सदस्यांनीही घेतली आहे म्हणूनच आमच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत यशस्वी होईल व  प्रेक्षकवर्ग या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील, अशी मला अपेक्षा आहे .  
 
'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

पुढील लेख
Show comments