Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचे नामांकन

madhuri dixit in marathi movie
, सोमवार, 28 जानेवारी 2019 (11:36 IST)
बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढंच मोठं घर करून आहे, हे तिने मराठीत केलेल्या 'बकेट लिस्ट' या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी 25 मे रोजी हा सिनेमा  प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागात नामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरीने धमाकेदार बाइक रायडिंग केली होती. योग्य वयानुसार आलेली तिची ही भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?'च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला 'गुलाबजा'साठी, तेजस्विनी पंडितला 'येरे येरे पैसे'साठी, कल्याणी मुळे हिला 'न्यूड'साठी तर मृण्मयीला 'फर्जंद'साठी  नामांकनं मिळाली आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार