Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अगडबम'ची नाजुका परतली

Webdunia
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (14:43 IST)
गेल्या ८ वर्षापूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अगडबम' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमातील सर्वांची लाडकी 'नाजुका' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, 'माझा अगडबम' मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कारण, या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेबरोबरच लेखिका. दिग्दर्शिका, निर्माती अश्या त्रीसुत्री भूमिकेतही ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात, नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत, मराठीचा सुपरस्टार अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. त्यामुळे,अभिनयात वैविध्यपण जपणाऱ्या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची वजनदार मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरपोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र हि व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
 
सुपरहिट 'अगडबम' च्या या दमदार सिक्वेलच्या सादरीकरणाची फळीदेखील तितकीच दमदार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपटनिर्माते आणि वितरक जयंतीलाल गडा यांची पेन इंडिया लिमिटेड कंपनी प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. शिवाय, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

राणी मुखर्जीने कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वर्ल्ड रोज डे साजरा केला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments