Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंगेश देसाई प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2019 (16:05 IST)
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
 
आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. मात्र आता 'जजमेंट' या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहेत. एका आयएएस ऑफिसरची भूमिका ते या चित्रपटात साकारत असून अंगावर शहारे आणणारी ही व्यक्तिरेखा आहे. आजवर त्यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक चांगली - वाईट व्यक्तिमत्वे आपल्या समोर आणली, परंतु अशा प्रकारची नकारात्मक भूमिका ते पहिल्यांदाच साकारत आहेत. समाजातील काही नकारात्मक बाबीही त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येतील. माणसांमध्ये इतकी विकृती असू शकते, याचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या भूमिकेविषयी मंगेश देसाई म्हणतात, खरंतर एक कलाकार म्हणून आम्ही 'स्विच ऑन, स्विच ऑफ' पटकन होतो. परंतु हा चित्रपट त्याला अपवाद आहे. ही व्यक्तिरेखा मला शुटिंगनंतरही विचार करण्यास प्रवृत्त करायची. मुळात वैयक्तिक आयुष्यात मी असा अजिबात नाही. तरीही एक अभिनेता म्हणून मी 'या' भूमिकेला माझ्याकडून पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. पॅकअप झाल्यावर जेव्हा मी मंगेश असायचो तेव्हा मात्र ही व्यक्तिरेखा मला भावनिकदृष्ट्या खूपच निराश करायची. अनेकदा मला वाईटही वाटायचे. इतकी ही भूमिका क्रूर आणि भयंकर आहे. एक बहुगुणी अभिनेता असल्याने मंगेश देसाई यांनी या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. प्रत्येकवेळी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या थरारपटात मंगेश देसाई यांच्यासोबत तेजश्री प्रधानचीही मध्यवर्ती भूमिका आहे. तेजश्रीची भूमिकाही तितक्याच ताकदीची आणि निर्भीड आहे. त्यामुळे या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे, ही पर्वणीच ठरणार आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित आणि डॉ. प्रल्हाद खंदारे व हर्षमोहन कृष्णात्रेय निर्मित 'जजमेंट' या चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून थरार अनुभवायला मिळेल यात शंका नाही. हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली

अद्भुत असा चंदेरी किल्ला

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments