Festival Posters

गुलशन देवय्या मांडणार मराठीत 'डाव'

Webdunia
मराठी चित्रपटाचा विषय आणि प्रसिद्धी लक्षात घेता, बॉलीवूडकरांच्या नजरा मराठी सिनेसृष्टीकडे वळलेल्या दिसून येत आहे. दिवसेंदिवस मराठी चित्रपटांची प्रगती वाढत असल्याकारणामुळे अनेक हिंदी कलाकारांनी या मायमराठीत नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे, रसिकांनी देखील त्याला लगेच आपलेसे केले असल्यामुळे, बॉलीवूडकरांचा मराठी चित्रपटातील कल वाढला आहे. 
 
हिंदीत विशेष नाव आणि प्रसिद्धी मिळून देखील, मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकरांच्या यादीत गुलशन देवय्या या अभिनेत्याचे नाव नव्याने दाखल होत आहे. राम लीला,  शैतान,  तसेच हंटर या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा हा अभिनेता लवकरच 'डाव' या मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
 
मूळच्या बंगळुरूचा असणाऱ्या गुलशनने या सिनेमासाठी महिनाभर मराठीचे धडे गिरवून घेतले असल्याचे समजते. याद्दल सांगताना गुलशनने सांगितले की, 'यापूर्वी हंटर या सिनेमात मी मराठीमध्ये काही एक-दोन वाक्य बोललो असेल, पण त्यामुळे मला मराठी बोलता येते असे नव्हते. मात्र, आगामी 'डाव' या मराठी सिनेमासाठी मला अस्सलखीत मराठी बोलणे गरजेचे होते, शिवाय या सिनेमाची कथा मला खूप आवडली होती, त्यामुळे भाषेच्या समस्येमुळे चित्रपट नाकारण्याची रिस्क मी घेतली नाही, त्यापेक्षा महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे मला योग्य वाटले. अर्थात मुंबईतील मराठी वातावरणात मी राहिलो असल्यामुळे, हि भाषा अवगत होण्यास जास्त वेळ लागला नाही. आता मी चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो' . 
 
आतापर्यंत बॉलीवूडच्या अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती करणाऱ्या ऑडबॉल मोशन पिक्चर्स प्रस्तुत  'डाव' हा पहिलाच मराठी सिनेमा असून कनिश्क वर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा द्विभाषेमध्ये हा सिनेमा चित्रित झाला असल्यामुळे, तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. टॉनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या सिनेमाचे निर्माते आहेत. हिंदीत विशेष कामगिरी बजावणारा गुलशन मराठीत काय 'डाव' मांडतोय हे लवकरच कळेल.
सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

२०२६ मधील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक बॉबी देओलचा 'बंदर' या दिवशी मोठ्या पडद्यावर येणार

न्यायाचा आवाज न्यायालयाच्या खोलीत गुंजणार, तापसी पन्नू 'अस्सी' मध्ये निर्भय अवतारात दिसणार

रझिया सुलतान' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम एम बेग यांचे निधन, घरी मृतावस्थेत आढळले

पाण्याखालील सुंदर जग एक्सप्लोर करायचे आहे का? भारतातील ही ठिकाणे स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर रितेश विलासराव देशमुख यांची विशेष भेट

पुढील लेख
Show comments