Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धैर्या, ढुंग्या आणि कबीर 'बॉईज २' मध्येदेखील करणार दंगा

Webdunia
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (13:21 IST)
गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी 'बॉईज २' मध्येदेखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' असे टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर 'बॉईज' सिनेमातील तीच अतरंगी पोरं आपल्याला दिसून येतायत. शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी, त्यांची मस्ती अजून काही कमी झाली नसल्याचे, त्यांच्या हास्यातून कळून येते. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमातून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड, प्रेक्षकांसठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत. 
 
येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने लिहिले असून, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तसेच, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

पुढील लेख
Show comments