Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेश-अंबरची सुपरहिट जोडी 'अंड्या चा फंडा'द्वारे पुन्हा एकत्र...

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:11 IST)
मराठी सिनेमातील पठडीबाहेरच्या आणि रिअलिस्टीक विषयांमुळे चर्चेत राहिलेली अंबर हडप-गणेश पंडित ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. 'बालक पालक' आणि 'यलो' सारख्या दर्जेदार विषयानंतर आता हे दोघे 'अंड्या चा फंडा' या सिनेमाद्वारे एकत्र येत आहेत. आशयपूर्ण कथानकासोबतच रसिकांचे मनोरंजन हा या हिट जोडीचा फॉर्म्युला त्यांच्या या आगामी सिनेमांत देखील वापरला गेला असल्याचे खात्रीलायक सांगता येईल. संतोष शेट्टी दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाचे अंबर-गणेश यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
 
ह्या चित्रपटाविषयी बोलताना,  'आम्ही नेहमीच काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो, सिनेमे मोजके असले तरी चालतील, पण ते नाविन्यपूर्ण असायला हवेत असा आमचा अट्टाहास आहे. हा सिनेमादेखील असाच वेगळ्या धाटणीचा असल्यामुळे आम्हा दोघांना त्याची पटकथा लिहिण्याचा मोह आवरता आला नाही' असे अंबर - गणेश या जोडीने सांगितले. ह्या वेळी ह्या जोडीला एक नवा साथीदार येऊन मिळालाय. त्याच नाव श्रीपाद जोशी.
 
अध्यास क्रिएशन्सचे विजय शेट्टी निर्मित तसेच प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या सिनेमाच्या हटके नावामधूनच हा लहान मुलांवर आधारित असल्याचे कळते. दोन जिवलग मित्रांची धम्माल यात पाहायला मिळणार आहे. हि दोघे कशा पद्धतीने एक इच्छा पूर्ण करतात आणि त्या मार्गावर येणारी कोडी कशी उलगडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा सिनेमा ३० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजी महाराजांवर जवजवळ दोन चित्रपट रिलीज, कोणाला नुकसान?

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

पुढील लेख
Show comments