Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

…आणि संतोषला वाटले 'भूत' आला !

Webdunia
रात्री-अपरात्री अचानक आपल्या दरवाजावर थाप बसली, तर काय होईल?... आणि त्याचवेळी चित्रविचित्र आवाज आणि हालचाली दिसू लागल्या तर...! घाम फुटला ना! असंच काहीसं घडलंय संतोष जुवेकर या अभिनेत्यासोबत. 'बॉईज' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान संतोषला व्हॅनीटी व्हेनमध्ये अश्याच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. तो गाडीत एकटा असताना कोणीतरी दरवाजा ठोकतोय, असा त्याला भास होत असत. एकदा दोनदा त्याने दार उघडून पहिले देखील, मात्र त्याला कोणीच दिसले नाही. शिवाय काही विचित्र आवाजदेखील त्याला ऐकू येत असत. पुणे शहरापासून दूर भोर गावात या सिनेमाचे चित्रीकरण होत असल्यामुळे गावठिकाणी, गर्द झाडीत सलग कित्येक दिवस त्याला असे भास होत असल्याने, तो खूप अस्वस्थ झाला होता. आपल्यासोबत होत असलेल्या या गोष्टीची वाच्यता त्याने अखेर सिनेमाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांच्याकडे केली, आणि त्यानंतर संतोषला सतावत असलेल्या भूतांचा शोध लागला. 
 
संतोषला त्रास देत असलेली ही तीन भूतं म्हणजे पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड आहेत, हे जेव्हा समजले तेव्हा सेटवर सर्वत्र हशा पिकला. 'बॉईज' या सिनेमातील प्रमुख भूमिकेत असलेल्या या तिघांच्या मस्तीने केवळ संतोषच्याच नव्हे तर संपूर्ण युनिटच्या नाकात दम आणला होता. या त्रिकुटांची जमलेली गट्टी सिनेमातदेखील अशीच पाहायला मिळणार असून, किशोरवयीन मुलांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा जनरेशन गॅप समस्येवर चांगले औषध ठरणार आहे.  सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे

पुढील लेख
Show comments