Marathi Biodata Maker

‘बेस्ट मोशन पिक्चर्स’मध्ये परदेशी भाषा पुरस्कार विभागामध्ये होणार प्रदर्शन

Webdunia
शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (11:37 IST)
‘बाबा’ हा चित्रपट संपूर्ण देशभर आज प्रदर्शित झाला असून त्याला चित्रपट समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. दिग्दर्शक आणि निर्माते यांनी घेतलेली मेहनत आणि चित्रपटाची सजग आणि मार्मिक अशी हाताळणी यामुळे चित्रपट सर्वत्र गाजत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाला लोकांची वाहवा मिळत असतानाच संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज २०२०’मध्ये दाखवला जाणार आहे. ‘बेस्ट मोशन पिक्चर्स’मध्ये परदेशी भाषा पुरस्कार विभागामध्ये त्याचे प्रदर्शन होणार आहे. 
 
‘बाबा’ची निर्मिती मान्यता दत्त यांच्या नेतृत्वाखालील ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि अशोक व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’तर्फे होत आहे. हा चित्रपट राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत.
 
या चित्रपटाच्या निर्माती मान्यता दत्त म्हणाल्या, “आम्हांला अभिमान वाटतो की आमची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ गोल्डन ग्लोब्जमध्ये दाखवला जाणार आहे. आमचा यापुढे अर्थपूर्ण आणि तरीही मनोरंजन करणारे चित्रपट बनवण्याचा मानस आहे. ‘बाबा’ही त्याच पठडीतील चित्रपट आहे. मला पूर्ण आशा आहे की या चित्रपटाला प्रेक्षकांची साथ आणि त्यांचे प्रेम मिळेल.”
‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार यांनी ‘बाबा’ या चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज’साठी झाल्याबद्दल आनंद आणि उत्कंठा व्यक्त केली आहे. “बाबा’ हा कोकणातील एका अत्यंत सुंदर अशा गावात आकाराला येणारी कथा पडद्यावर साकारतो. चित्रपटाचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रत्येकाशी हा चित्रपट जोडला जाईल. आमचा पहिला चित्रपट ‘बकेट लिस्ट’प्रमाणे ‘बाबा’या चित्रपटालाही तेवढीच यश मिळेल, अशी मला पूर्ण खात्री आहे. आम्ही आणखीनही असे अनेक चित्रपट बनविण्याची योजना आखली आहे. त्यात प्रादेशिक, मुख्य धारेतील चित्रपटांचा समावेश असून ते मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असतील,” असेही श्री अशोक सुभेदार यांनी म्हटले.
 
अशोक आणि आरती सुभेदार यांनी ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ या आपल्या बॅनरखाली नवीन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्याचे आपले धोरण कायम राखले. याच धोरणाला अनुसरून त्यांनी ‘बाबा’ या चित्रपटाची निवड केली. चित्रपटाला आवश्यक असलेले प्राथमिक पाठबळ दिले. त्यांनी राज गुप्ता यांच्याबरोबर सहकार्य करत आणि त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देत सर्वोत्तम अशी निर्मिती करण्यासाठी पाठबळ दिले. संजय दत्त प्रॉडक्शन्समुळे या निर्मितीला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन

मधू मंटेना आणि इरा त्रिवेदी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असून, नामकरण सोहळा वैदिक रिती रिवाजानुसार पार पडला

चंद्रकांता' फेम अभिनेते भरत कपूर यांचे निधन

दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच आली समोर; पती रणवीर सिंग घेत होता काळजी

पुढील लेख
Show comments