Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विनोदी मल्टीस्टारर्सचा 'वाघेऱ्या'

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (11:11 IST)
एप्रिल महिन्याची सुरुवात म्हंटली कि 'एप्रिल फुल'ला उधान येते. एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात हास्याचा पाऊस पाडणा-या या 'फुल'ची मज्जा प्रत्येकजण घेत असतो. हीच मज्जा घेऊन मराठीतील काही दिग्गज कलाकार खास एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांसमोर येत आहे. माणसांना रडवणे खूप सोपे असते, मात्र हसवणे त्याहून कठीण. म्हणूनच तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी विनोदवीरांना अनेक मशागत करावी लागते. मायबाप प्रेक्षकांच्या एका हसूसाठी आपल्या दर्जेदार अभिनयाद्वारे विनोदाचा स्तर उंचावणारे असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला मराठीत पाहायला मिळतात. अश्या या सर्व भन्नाट विनोदवीरांचा बंपर पॅकेज असलेला 'वाघेऱ्या' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शन निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शक समीरआशा पाटील यांनी केले आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या चित्रपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम यांसारख्या अनुभवी आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी देण्यास येत असलेल्या या सिनेमाचे राहुल शिंदे आणि केतन माडीवाले निर्माते आहेत.
नाटक, मालिका आणि चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना लोटपोट हसवणारे हे विनोदवीर प्रथमच 'वाघेऱ्या' या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले असल्यामुळे, या सिनेमाद्वारे विनोदाचा वारू चौफेर उधळणार हे निश्चित !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

राणी मुखर्जीने कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वर्ल्ड रोज डे साजरा केला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments