Publish Date: Wed, 28 Oct 2020 (07:36 IST)
Updated Date: Wed, 28 Oct 2020 (07:38 IST)
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे शूटिंग केले जाणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी हे शूटिंग होणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी ही पुणे विद्यापीठाच्या आवारात अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे, त्यासाठी सेटही उभारण्यात आले होते. कोरोना लॉकडाऊननंतर आता पहिलेंदाच विद्यापीठात चित्रपटाचे शूटिंग होत आहे. मुख्य इमारतीसमोर काही दृश्यांचे शूटिंग केले जाणार असून, त्यास विद्यापीठ प्रशासनाने मान्यता दिली आहे.
चित्रपटाला प्रतितास 25 हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर 5 लाख रुपये अनामत रक्कम स्वीकारण्यात आली आहे. विद्यापीठात शूटिंग होत असताना बॉलिवूडमधील स्टारकास्ट या ठिकाणी येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करून हे शूटिंग करावे लागणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन व पोलिसांपुढे आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
webdunia
Publish Date: Wed, 28 Oct 2020 (07:36 IST)
Updated Date: Wed, 28 Oct 2020 (07:38 IST)