झी मराठी वाहिनीवर ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
या वादानंतर निलेश साबळेने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ टाकला आहे. सादर करण्यात आलेला स्किटमधला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचं निलेश साबळेने म्हटलंय.