Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा प्रीमिअर २७ फेब्रुवारीला

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (12:30 IST)
इरॉस नाऊ ने आज आपल्या ओरिजिनल चित्रपट ‘पेन्शन’ची घोषणा केली असून यात सोनाली कुलकर्णी आणि सुमीत गुट्टे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचा प्रीमिअर २७  फेब्रुवारी २०२१ ला इरॉस नाऊ होणार आहे. ‘पेन्शन’ ही इंद्र नावाच्या मुलाची अतिशय विलोभनीय कथा असून त्याचा लहानपणापासून तरुणपणापर्यंतचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. या प्रवासात घडणारे अनपेक्षित प्रसंग, आपण असे घडू यावर इंद्राचा विश्वास बसणार नाही असे त्याचे नशीब त्याला कसे घडवते ती कथा म्हणजे पेन्शन.
 
पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ यांनी दिग्दर्शित केलेला ‘पेन्शन’ हा चित्रपट इंद्राच्या वेगवेगळ्या ट्विस्ट आणि घटनांनी भरलेल्या जीवनाच्या प्रवासाविषयी उलगडा करणारा चित्रपट आहे. विचारसरणीच्या सादरीकरणात प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या रहस्यमय मार्गांबद्दल खूप विचार करावा लागतो. निखळ मनोरंजन आणि नाटकांची दुर्मिळ रचना, पेन्शनमधील नायकाच्या प्रवासाचे वेगवेगळे स्तर पाहताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर  हास्य आणेल.
 
या चित्रपटाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणतात, " पेन्शन ही आयुष्याबद्दलची एक मार्मिक कथा आहे. प्रत्येक सीन विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. ही एक भावस्पर्शी कहाणी आहे जी आपल्याला साधेपणा आणि निरागसतेचे मूल्य प्रभावीपणे सांगते. मी सर्वात अर्थपूर्ण प्रकल्पांपैकी एकाचा भाग आहे, हे मी माझे भाग्य समजते."
 
‘पेन्शन’ मुलाची निरागसता दर्शवते जेव्हा तो तारुण्याकडे प्रवास करत असतो. जीवनातील वेगवेगळी आव्हाने आणि त्यावरचा विजय जे आपल्याला एक मनोरंजक कथा दाखवतात आणि पेन्शन हे हृदयस्पर्शी पद्धतीने सादर करते.
 
पहात रहा! पेन्शन पाहण्यासाठी ट्यून इन करा २७ फेब्रुवारी २०२१ रोजी फक्त इरॉस नाऊ वर!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

पुढील लेख
Show comments