Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्यांदाच ओटीटीवर येणार प्लॅनेट मराठी, खास मराठी मनोरंजनासाठी

Webdunia
बुधवार, 22 जुलै 2020 (09:26 IST)
मराठी भाषेला या ओटीटीवर स्थान मिळताना दिसत नाही. प्लॅनेट मराठी ओटीटी हे भारतातले पहिले मराठी भाषेतील मनोरंजनास प्राधान्य देणार आहे.
 
म मनाचा, म मराठीचा ही याची टॅगलाईन आहे. मराठी कलेला प्राधान्य मिळावे आणि मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील मनोरंजन एका क्लिकवर उपलब्ध व्हावे हेच प्लॅनेट मराठी ओटीटीचे ध्येय आहे. चित्रपट, नाटकं, सत्य घटनांवर आधारित तसेच काल्पनिक कलाकृती, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी, या साऱयांची सांगड घालणारा हा एकमेव मराठी ओटीटी असणार आहे. मनोरंजनच नव्हे तर पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रम हे सारेच या ओटीटीवर उपलब्ध असेल. अँड्रॉइड व आयओएस धारकांसाठी मनोरंजनाची नवी परिभाषा आखणाऱया या ओटीटीने प्रत्येक मराठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास प्रयोजन केलेले आहे  . 
 
प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेचे सीएमडी आणि मराठी चित्रपटसफष्टीतले नावाजलेले निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले की, मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील. 
 
प्लॅनेट मराठी बाबत बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळाबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहत आहे. पुष्कर हे सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हीसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संगीत संयोजक आदित्य ओक हे प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेसचे सीओओ आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

ही बॉलीवूड अभिनेत्री होती करण जोहरचे पहिले प्रेम

विक्रांत मॅसेने चित्रपट व्हाईटची तयारी सुरू केली, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांचे पात्र साकारणार

कपिलच्या शोच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, अनेक मोठ्या नावांचा समावेश

Shani Dev Temple चमत्कारी शनिदेव मंदिर खरसाली उत्तराखंड

अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यावरून वाद

पुढील लेख
Show comments