Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Webdunia
बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (14:51 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यात एका नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळत आहे. ही कथा प्रेक्षकांना नातेसंबंधातील एका महत्वाच्या पैलूशी जोडून ठेवेल. “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. हा चित्रपट २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या  प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोग यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच, या चित्रपटातही नात्यातील गुंतागुंत, भावनिक संघर्ष, आणि जीवनातील काही कंगोरे मांडण्यात आले आहेत. पुष्कर जोगचे चित्रपट प्रेक्षकांना  नेहमीच विचार करायला भाग पाडणारे असतात आणि हा चित्रपटही त्या परंपरेतून तयार झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दुबईसह ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये झाले असून खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिस मध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. 
 
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “आजच्या आधुनिक काळातही लैंगिक सुसंगतता हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नातेसंबंधांना फक्त भावनिक किंवा मानसिक बळ पुरेसं नसतं, तर शारीरिक सुसंगतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही हा विषय एका सहज पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”
ALSO READ: चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट येत्या २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.
ALSO READ: फसवणूक प्रकरणात सोनू सूद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

ही बॉलीवूड अभिनेत्री होती करण जोहरचे पहिले प्रेम

विक्रांत मॅसेने चित्रपट व्हाईटची तयारी सुरू केली, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांचे पात्र साकारणार

कपिलच्या शोच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, अनेक मोठ्या नावांचा समावेश

Shani Dev Temple चमत्कारी शनिदेव मंदिर खरसाली उत्तराखंड

अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यावरून वाद

पुढील लेख
Show comments