suvichar

अर्जुन रामपालच्या डॅडी मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे

Webdunia
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (16:40 IST)
मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडून हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. राजेश शृंगापुरे हे मराठी सिनेजगतातलं नावाजलेलं नाव आपल्याला आता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळणार आहे. अर्जुन रामपाल याचा बहुचर्चित 'डॅडी' या सिनेमात राजेश महत्वाची भूमिका साकारणार आहे. 
 
'स्वराज्य', 'संघर्ष' यांसारख्या अनेक मराठी सिनेमात राजेश अनेक चांगल्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. 'झेंडा' या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खुप कौतुक केले. राजेश शृंगारपूरे आपल्याला कायम धडाकेबाज भूमिका साकारताना दिसले.  राजेश यांनी मराठीसोबतच 'सरकार राज', 'मर्डर थ्री' या हिंदी सिनेमात देखील कामे केली.  मराठी तसेच हिंदी सिनेमा असो किंवा छोटा पडदा असो ही दोन्ही माध्यमे गाजवलेल्या राजेश यांनी दोन हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. त्याच्या या सिनेमातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. 'डॅडी' या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले. 'अरुण गवळी' यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॅडी या सिनेमात राजेश शृंगारपुरे एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

आशा भोसले यांच्या निधनाबद्दल देश शोक व्यक्त करत आहे, पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

आशा भोसले यांचे निधन, त्यांच्याशी संबंधित २५ खास गोष्टी जाणून घ्या

अलविदा आशाताई: आशा भोसले या गायिका असण्यासोबतच खवय्याही होत्या आणि त्यांनी १० देशांमध्ये रेस्टॉरंट्स उघडली होती

आशा भोसले यांनी १२ हजार गाण्यांना आपला आवाज दिला, वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केले

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments