Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Savita Bhabhi tu ithech thanb video viral
, गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (11:57 IST)
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चित्रपटातील गाण्याचा आहे. या गाण्याचे नाव ‘तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!’ असे आहे. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
प्रायोगिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आलोक राजवाडेचे‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण होत आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात सईसोबत पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. तर सई ताम्हणकर सविता भाभी ही व्यक्तीरेखा साकारत आहे.
 
या चित्रपटासमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. आता या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. चित्रपटातील पात्र हे कॉमिक कॉपीराइट असताना त्याबद्दल कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असं म्हणतं त्यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक