Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून भडकला अभिनेता कुशल बद्रिके

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (07:27 IST)
Twitter
‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके म्हणजे आपला लाडका कुश्या. आपल्या कामाने तो सगळ्यांनाच चांगला परिचयाचा आहे. कुशल आज यशाच्या शिखरावर आहे, तो कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या भूमिका साकारत, परिस्थितीशी दोन हात करत त्याने कायम सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत हसवण्याचे काम केले आहे. असे असले तरी या हॅप्पी गो लकी आणि मोकळ्या स्वभावाच्या कुशलचा एका गोष्टीमुळे पारा चढला आहे. कुशलच्या सोशल मीडियाच्या पोस्टचा आधार घेत एका वेबसाईटने वेगळीच बातमी दिल्याने त्याने संताप व्यक्त केला आहे.
 
झालं असं की, दोन दिवसांपूर्वी लंडनला जात असताना कुशल बद्रिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात कुशल सांगतो, मी एकट्याने कधीच सिनेमा पाहिलेला नाही, मध्यंतरात समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटतं. एवढंच काय तर एकटाच असा हॉटेलमध्ये जाऊन मी कधी जेवलेलो पण नाही, मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही. अगदी असंच एकट्याने प्रवास करायला मला आवडत नाही. कदाचित मी स्वतःची कंपनी फार एन्जॉय करत नसेन. पण आज सिनेमाच्या शूटींगसाठी एकटं लंडनला जावं लागतय. इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वीचा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो या गोष्टीचं मला आजही अप्रूप वाटत. खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश. अवेळी रात्र या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हवं यार.पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे, असा विचार मनात येतो. पण तरीही वाटतं…. किमान आंतरराष्ट्रीय प्रवासामधे आपल्या वाट्याचे 2-पेग प्यायला तरी कुणी हवं होतं….हॅप्पी जर्नी टू मी”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
 
त्याची ही पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र या पोस्टवर एका वेबसाईटने ‘शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच… अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली एकच खळबळ’, अशी बातमी चालवली. कुशलने ही बातमी वाचताच त्याबद्दल राग व्यक्त केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया म्हणून त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, माझ्या पोस्टवरून अशी बातमी करणारा माणूस कमाल आहे. असा माणूस सुखाने झोपू कसा शकतो, असा प्रश्नही त्याने विचारला आहे. देव यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

पुढील लेख